Skip to main content

Posts

Showing posts from August, 2007
माझी आजी माझ्या कवितांचा विषय होइल असं वाटलं नव्हतं कविता प्रेयसीसाठी असते असलेल्या किंवा नसलेल्या कविता आइसाठी असते परत असलेल्या किंवा नसलेल्या पण तरीही मला लिहावी लागते आजीसाठी कविता कारण साठवत राहिलो तिच्याबद्दलची करुणा, चीड, सहानभूती तर मीही किडेन आतपासून. तसं आता उरलयं काय? दुखणारी हाडं, पिचलेले मणके, निर्बळ ह्र्दय, कमकुवत किडनी, लाचार रडणं, असहाय कण्हणं, रडके डोळे, ख्ण्गलेला चेहरा. तरी संपत नाही जगण्याच्या आशेचा चिवट तंतू वाढत जाते औषधांची यादी घटत जातो बैंक् बेलन्स. मग क्रमाक्रमाने मी तिचा विचार करतो, का माझाच? तिला झिडकारावं,बोलावं,घोटून मारावं, तिला गोष्टी सांगाव्यात, तिला चालवावं, तिला भरवावं, किंवा दुर्लक्ष करावं तिच्याकडे, ती जणू नसल्यागत. तशी ती कोण? संसाराच्या चरकात पिळून निघालि मुलगी बाई आई म्हणून. द्वेष, मत्सर, राग, लोभ बाळगत ओढून काढला घराचा गाडा. ती, चारचौघीतली एक तेनं भोगलं नाही काही, त्यागलंही नाही काही. निसर्गनियमाने जन्मली,जगली आणि आता...... मी का तिच्या मरणाची वाट बघतोय? ती माझी कोण, अन् मी तिचा कोण्? पण, तेचं अस्वथ तडफ़डणं, मरणाची भीक अन् मांजरानं अर्धमेल्या उंदर...