दुपार सम्पते आणि निवत आलेल्या उन्हापाठोपाठ ढगाळून जाते आकाश पावसाचे नवे थेम्ब येतात सावकाश ओलेकच्च डाम्बरी रस्ते चुकार तापल्या मातीचा सुवास सिमेन्टच्या या शहराला सुध्दा का लागते पावसाची आस सारेच रन्ग नव्याने रन्गतात आभाळाचा रन्ग घेउन ऊन निसटते अलगद ढगाला सोनेरी कड देउन तर एक् असे कर मिटून जाइल ही सन्ध्याकाल आठवणीची पाने लिहून ठेव तुJह्या तहानलेल्या काळजाचा पत्ता नव्या पावसाला देउन ठेव