अस वाटत नाही,
आपल्याच जुन्या कविता परत पाहताना
साला हे आपणच लिहिलेल
हररोज
आपल्या जगण्याचे कारण
मी पणाला लावून पहातो,
प्रयत्न करतो हरएक दिवस सच्चा जगण्याचा.
तेव्हा काहीवेळा ढासळतो
मोठाया निकराने लढवलेला उमेदीचा बुरुज,
तटबन्दी फुटते,
आणि हातघाईच्या लढाईत
माझ्या हाताला फक्त माझे शब्द
तेव्हा त्यानाच वापरत मी लढत रहातो.
अजून लढाई जारी आहे.
तहाचे प्रस्ताव ठोकरले गेलेत
शरणागतीचा पान्ढरा झेन्डा फाटलाय
उरतात दोनच पर्याय,
लढत लढत जिन्कणे
पुन्हा नव्याने लढण्यासाठी,
किन्वा
ज्या वाटेवर चालत आलो
त्याच वाटेवरच सम्पणे
कोण्या नव्याला वाट देण्यासाटी....
आपल्याच जुन्या कविता परत पाहताना
साला हे आपणच लिहिलेल
हररोज
आपल्या जगण्याचे कारण
मी पणाला लावून पहातो,
प्रयत्न करतो हरएक दिवस सच्चा जगण्याचा.
तेव्हा काहीवेळा ढासळतो
मोठाया निकराने लढवलेला उमेदीचा बुरुज,
तटबन्दी फुटते,
आणि हातघाईच्या लढाईत
माझ्या हाताला फक्त माझे शब्द
तेव्हा त्यानाच वापरत मी लढत रहातो.
अजून लढाई जारी आहे.
तहाचे प्रस्ताव ठोकरले गेलेत
शरणागतीचा पान्ढरा झेन्डा फाटलाय
उरतात दोनच पर्याय,
लढत लढत जिन्कणे
पुन्हा नव्याने लढण्यासाठी,
किन्वा
ज्या वाटेवर चालत आलो
त्याच वाटेवरच सम्पणे
कोण्या नव्याला वाट देण्यासाटी....
Comments