नशीबास "कर हवे तेवढे वार" म्हणालो
"मानणार ना कधी मी हार" म्हणालो
केला सौदा संकटान्सवे आणि व्यथेला
"खुशाल यावे उघडे आहे दार" म्हणालो
खेळवून मज नियती अखेर जेव्हा दमली
डाव नवा मांडून तिला "तैयार" म्हणालो
रिचवून सारे तुडुंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही "आभार" म्हणालो
कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते..
हसून त्याला "केवळ खांदे चार" म्हणालो
रडलो नाही.. लढलो, भिडलो आयुष्याल
राखेतुनही उठलो अन "यल्गार" म्हणालो
- गुरू ठाकुर
"मानणार ना कधी मी हार" म्हणालो
केला सौदा संकटान्सवे आणि व्यथेला
"खुशाल यावे उघडे आहे दार" म्हणालो
खेळवून मज नियती अखेर जेव्हा दमली
डाव नवा मांडून तिला "तैयार" म्हणालो
रिचवून सारे तुडुंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही "आभार" म्हणालो
कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते..
हसून त्याला "केवळ खांदे चार" म्हणालो
रडलो नाही.. लढलो, भिडलो आयुष्याल
राखेतुनही उठलो अन "यल्गार" म्हणालो
- गुरू ठाकुर
Comments