Skip to main content

Posts

Showing posts from May, 2007
पेपरच्या पहिल्या पानावर एक मोठी जाहीरात त्यात निळे निळे आकाश, त्याखाली हिरवे हिरवे गवत आणि त्यात धावणारे गोबरे गोबरे पोर ताज्या दिवसाच्या ताज्या सकाळचा निमताजा पेपर सरकवला जातो पिशवीत पोळीभाजीच्या डब्याबरोबर त्यानन्तर लोकलच्या गर्दित,फोर्थसीटवरच्या अर्ध्या बैठकीत, आकाश,गवत, गोबरे पोर बाहेर पडतात. आपणच आपल्याला न सापडण्याच्या गर्दीत डिओडरन्ट,तेल,शाम्पू,घाम यान्च्या वासात मोबाइल,शिव्या,गप्पा यान्च्या पार्श्वसन्गीतात डब्यात हरवतात आकाश आणि गवताचे राखीव तुकडे. यथावकाश दिवस येतो भरमाथ्यावर अन् सम्पतोही. परततात माणसे एकमेकाना दाबत,चेन्गरत,घुसमटत घराकडे आपुल्या. हळूहळू, शहराच्या पिवळ्या दिव्याच्या आकशाखाली,फूटपाथच्या सीमेत घर नावाच्या अभयारण्यात डबा जातो स्वैपाकघरात घासायला, निळे आकाश हिरवे गवत, गोबरे पोर शिळ्या दिवसाच्या डबल शिळ्या रद्दीत.
बस् एक कर पुन्हा तुझ्या पावलान्चा नाद माझ्या आयुष्याला देऊ नकोस. पुन्हा तुझ्या हाकान्चे आभासमाझ्यापर्यन्त येऊ देऊ नकोस. मी आता, काठोकाठ बुडालोय दुखाच्या मदमस्त नशेत, ह्या गर्द काळोखावर तू पुन्हा प्रकाशाची रेघ ओढू नकोस.
येतील असे दिवस जेव्हा आयुष्य सुन्दर असेल येइल असाही दिवसजेव्हा मरण्याला अर्थ असेल. डोळ्यात दाटलेल्या प्रत्येक अश्रूची फुले होतील अशीही असेल वेळ जेव्हा सारे दरवाजे खुले होतील. अशीही असेल वेळ जेव्हा जगण्याची कविता झाली असेल हे जग माझ्यात मिटले असेल अन् माझे निशाण कुठेच नसेल

last

those awaiting shores, and those stormy waves i have not yet left the ship! where, sailors die being honest with their sinking ship there only born generations saving their nation. listen, mighty storm i have not yet surrendered. i have not yet left the ship.