Skip to main content
पेपरच्या पहिल्या पानावर एक मोठी जाहीरात
त्यात
निळे निळे आकाश,
त्याखाली हिरवे हिरवे गवत
आणि त्यात धावणारे गोबरे गोबरे पोर
ताज्या दिवसाच्या
ताज्या सकाळचा
निमताजा पेपर
सरकवला जातो पिशवीत
पोळीभाजीच्या डब्याबरोबर

त्यानन्तर
लोकलच्या गर्दित,फोर्थसीटवरच्या अर्ध्या बैठकीत,
आकाश,गवत, गोबरे पोर बाहेर पडतात.
आपणच आपल्याला न सापडण्याच्या गर्दीत
डिओडरन्ट,तेल,शाम्पू,घाम यान्च्या वासात
मोबाइल,शिव्या,गप्पा यान्च्या पार्श्वसन्गीतात
डब्यात हरवतात
आकाश आणि गवताचे राखीव तुकडे.

यथावकाश दिवस येतो भरमाथ्यावर अन् सम्पतोही.
परततात माणसे एकमेकाना दाबत,चेन्गरत,घुसमटत घराकडे आपुल्या.
हळूहळू,
शहराच्या पिवळ्या दिव्याच्या आकशाखाली,फूटपाथच्या सीमेत
घर नावाच्या अभयारण्यात
डबा जातो स्वैपाकघरात घासायला,
निळे आकाश
हिरवे गवत,
गोबरे पोर
शिळ्या दिवसाच्या
डबल शिळ्या रद्दीत.

Comments

kiran aj khup divasanni tuzi kavita vachli!! ekdam mala kolatkaranchi kavita athjavli nahi tulna karit nahi!doghanchi shaili vegli ahe pan DRUSHYAMANTA he vaishishtya sane ahe! konitari thandpane cameryatun traysthapane tiptoy ase vatate ha thandpana angavar yeto!! natak kinva kuthlyahi Drushya kale pramane ek avakash ubhe rahte ani tyat khel suru hoto ani ha thandpana barfacha surya sarkha ghusat jato!!! khup channn!!!!